अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुकतेच प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. दुपारी 4 वाजेनंतर दुकाने उघडी ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
त्यांतरही दुकाने उघडी असल्यास संबंधित दुकाने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. या पार्श्वभुमीवर पोलीस व नगरपालिका प्रशासनाने तीन दिवसांपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
करोना काळात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलत दुकाने सुरू ठेवणार्या दुकानांविरोधात पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत तीन दिवसांत 30 दुकाने सील केली.
तसेच बेलापुरातील पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय सानप व नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दुपारी 4 वाजेनंतर उघडी असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत.
या पथकाने तीन दिवसांत 30 दुकानांना सील ठोकले आहे. या शिवाय शहरात विनामास्क फिरणार्या दुचाकीस्वार व नागरिकांवरही प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
तीन दिवसात अशा सुमारे 70 हून अधिक नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.