Diabetes patients : मधुमेहींनी आजच ‘या’ पदार्थांशी करा मैत्री नाहीतर नियंत्रणाबाहेर जाईल रक्तातील साखरेची पातळी

Diabetes patients : मधुमेहींच्या (Diabetes) रुग्णांनी नेहमीच त्यांच्या आहाराबाबत (Diabetes diet) काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar levels) नियंत्रणात ठेवणे खूप महत्वाचे आहे.

रुग्णांनी आवश्यक ती काळजी घेतली नाही तर हृदयाशी संबंधित समस्या, स्ट्रोक (Stroke) आणि अंधत्व इत्यादींसारखा धोका वाढू शकतो. मधुमेहींच्या रुग्णांनी काही पदार्थांशी मैत्री केली तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आवळा

आवळा (Amla) हा एक सुपरफूड आहे जो क्रोमियममध्ये समृद्ध आहे, ज्याचा स्वादुपिंडावर सकारात्मक प्रभाव पडतो, जिथे इन्सुलिन स्राव होतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

कारले

कारल्याची (Bitter gourd) चव खूप कडू असते, त्यामुळे अनेकांना ती खायला आवडत नाही. त्यात कॅरँटिन, व्हिसिन, ग्लायकोसाइड आणि अरेबिनोसाइड यांसारखी कडू रसायने आढळतात. ते हायपोग्लाइसेमिक गुणधर्मांनी समृद्ध आहेत आणि ग्लायकोजेन संश्लेषण वाढवून रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.

दालचिनी

दालचिनीच्या (Cinnamon) मदतीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते, यामुळे आपल्या शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे आपल्या पेशींमध्ये ग्लुकोजची वाहतूक सुरू होते. तुम्ही दालचिनीचे पाणी पिऊ शकता किंवा मसाला म्हणून सेवन करू शकता.

जांभूळ

जांभळात मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, त्यात जॅम्बोलिन नावाचे महत्त्वाचे ग्लायकोसाइड असते, जे स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर होण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी या फळाशी मैत्री करावी.

कडुलिंब

कडुलिंबात औषधी गुणधर्मांची कमतरता नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे, त्यात फ्लेव्होनॉइड्स, ट्रायटरपेनॉइड्स, अँटीव्हायरल कंपाऊंड्स आणि ग्लायकोसाइड्स असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. कडुलिंबाच्या पानांचा रस जरूर प्यावा.