अहमदनगर शहराच्या विकासावर संवाद चर्चा सत्र

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-  अहमदनगर शहराच्या विकासात बऱ्याच उनिवा आहेत ही कबुली देताना आमदार संग्राम जगताप यांनीही नकारात्मकता दूर करण्याचे आव्हान केले मागील दीड वर्षात कोरोणाचे सावट होते मात्र त्यावर मत करून अनेक योजना आता विविध स्तरावर मार्गी लावण्याचा अंतिम टप्प्यात आहे

शहराच्या विकासाचा हा अनुशेष नजीकच्या काळात भरून काढण्यासाठी नगरकरांच्या सक्रिय सहभागाची नितांत गरज आहेत या संवाद उपक्रमातून ही प्रतिक्रिया मूर्त रूप घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संवाद संस्थेच्या वतीने फरत एक्झिक्यूटिव्ह येथे आयोजित संवाद उपक्रमात आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेले डॉसोनवणे, डॉ अतुल खालकर, डॉ.हर्षवर्धन तंवर, डॉ.अविनाश मोरे, डॉ.एम के शेख, डॉ.इमरान शेख, महेंद्र कुलकर्णी, माणिक विधाते,

डॉ.निसार शेख, भूषण देशमुख, इंजि. कुलकर्णी, देवशिष शेंडगे, सौ.अक्षवैता शेंडगे, करीम हुडेकरी, अशोक गुंजाळ, अभिजित खोसे, जावेद शेख, यास्मिन शेख, सुहास मुळे, सुनील काळे, देवकुळे, सचिन जाधव, निखिल वारे, संजय गुगळे, समीर खान, रफिक मुंशी आदींसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

संवाद संस्थेचे अध्यक्ष उबेद शेख यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे डॉ.गिरीश कुलकर्णी व फरत एक्झिटयूचे संचालक अतीक शेख यांच्या सहकार्य लाभले व आमदार जगताप यांनी या उपक्रमात उपस्थितांशी संवाद साधला व शहराच्या विकासावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चर्चा करून विविध प्रश्नांवर वाचा फोडली व विविध योजना मांडल्या प्रामुख्याने महानगरपालिकेचे सुसज्ज रुग्णालय,

सावेडी नाट्यगृह, अमृत पाणी योजना हे प्रकल्प नजीकच्या काळात पूर्ण होतील याशिवाय शहरातील नगर पुणे रोड वरील उड्डाणपूल प्रगतिपथावर असतानाच पत्रकार वसाहत चौक ते सावेडी नाका या उड्डाणपुलासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती जगताप यांनी दिली शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने पुढचा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल अशी गवई जगताप यांनी दिली

कोरोनाचे संकट आले नसते तर यातील बऱ्याच गोष्टींची उभारणी सुरू झाली असतील येत्या दोन वर्षात बरेचसे प्रकल्प सुरू होतील अशी माहिती जगताप यांनी दिली मागील वीस पंचवीस वर्षातील नकारात्मकता उगाळून आता चालणार नाही ती दूर केली पाहिजे अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली

नगर अहमदनगर शहराशी माझी नाळ जुळलेली आहे दुसरा कुठला विचार माझ्या मनात येत नाही त्यामुळे अत्यंत कुठे गेलो तरी तेथे फार काळ माझं रमत नाही संवाद उपक्रमातून नव्या संकल्पनांना चालना मिळते या दृष्टीने मी स्वतः प्रयत्नशील आहे

शहराविषयी असलेली प्रतिमा पुसण्याचा व त्यातून शहराचे नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना हातात हात घालून करावा लागेल संवाद उपक्रमातून हा संकल्प आपण करू अशी गवाई जगताप यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24