अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- केंद्र सरकारने देशात कोरोनाच संकट वाढविण्याचे काम केलं. भाजप लोकहिताचा विचार करत नाही याउलट काँग्रेस हा मानवतावादी, लोकहित व लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. जातपात धर्म गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करणारा पक्ष आहे.
काँग्रेसला अनेक वेळा खूप कठीण प्रसंग आलेत परंतु त्या कठीण प्रसंगातून काँग्रेस पुन्हा सक्षमपणे उभी राहिली आहे. देशात पुन्हा एकदा काँग्रेसची लाट येणार आहे. असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
काँग्रेस बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्याला आवश्यक तेवढ्या लसीचा पुरवठा होत नसुन, भाजप देशातील विविध एजन्सीजच्या माध्यमातून दडपशाहीच राजकरण करत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान सध्या तरुणांचा काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग याचा अर्थ वातावरण बदलले आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची लाट येणार आहे. आगामी काळात शिर्डी नगरपंचायत व राहाता नगरपालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाणार असल्याची ग्वाही ना. थोरात यांनी दिली.
केंद्र सरकारने देशात कोरोनाच संकट वाढविण्याचे काम केलं, दोन्ही लाटांमध्ये बेफिकिरी दाखवल्याने देशाची अवस्था वाईट झाली. अशी टीका देखील त्यांनी केली.