अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- जगभरात 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ख्रिसमसचा दिवस येण्यापूर्वी बराच काळ आधीपासून जय्यत तयारी केली जाते. हा सण साजरा करण्यासाठी वीजेच्या रंगीबेरंगी दिव्यांनी रोषणाई केली जाते.
डेकोरेटीव्ह आयटम्सनी लोक आपली घरे सजवतात. ख्रिश्चन धर्मीय लोक या दिवशी खास ख्रिसमस ट्री सजवतात. आज आपण पहिला ख्रिसमस कधी साजरा झाला
हे जाणून घेऊ पहिला रोमन सम्राट याच्या सत्ताकाळात इसवी सन 336मध्ये पहिला ख्रिसमस साजरा करण्यात आला. हा दिवस होता 25 डिसेंबर.
त्यानंतर काही वर्षांनी पोप ज्युलीयस यांनी 25 डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करावा असे जाहीर केले.
तेव्हापासून जगभरात 25 डिसेंबर या दिवशी ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष असे की हा उत्सव केवळ ख्रिश्चन धर्मापूरताच नव्हे
तर इतर धर्मीयही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. खास करुन बच्चे कंपनीला या दिवसाचे फार आकर्षण असते.