ताज्या बातम्या

Sanjay Raut : १०० दिवस मी सुर्यप्रकाश पाहिला नाही… संजय राऊतांनी सांगितला जेलमधील थरारक अनुभव

Published by
Ahmednagarlive24 Office

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. मात्र आता कोर्टाने संजय राऊत यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊत हे तब्बल १०२ दिवसानंतर जेलबाहेर आले आहेत.

संजय राऊत यांनी बाहेर अलायनानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मी पुन्हा लढेल असा इशारा दिला आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या १०० दिवसांच्या जेलमधील थरारक अनुभव सांगितला आहे. चहासाठी तसेच सूर्यप्रकाश अशा अनेक गोष्टींबद्दल संजय राऊत यांनी खुलासा केला आहे.

संजय राऊत म्हणाले, १०० दिवस मी सुर्यप्रकाश पाहिला नाही. तुरुंगात प्रकाश असतो. त्याचा मला फार त्रास झाला. मला आता दिसत नाही. नजर माझी कमी झाली आहे. नजरेचा मला त्रास झाला. अनेक व्याधी मला जडल्या पण मला त्याच भांडवल नाही करायच. मी हार्ट पेशेंट आहे. मी सगळे तिथ सहन केले.

चहासाठी पण तडफडाव लागते. अनेकदा मी कोरा चहादेखील पिला आहे. या गोष्टी सांगून मला सहानभूती मिळवायची नाही. माझ्या मुलींच्या डोळ्यात मला अश्रु पाहायचे नाहीत. अशा खंत राऊत यांनी व्यक्त केली आहे.

मला कानान कमी ऐकु यायला लागले. कारण आवाजच नाही. वाचन नाही. एकांतवास काय असतो तो तिथे अनुभवले. समोर फक्त उंच भिंत बाकी काही दिसत नाही. त्या भितींशीच बोलत होतो.

स्वतःशीच बोलत होतो. मला लिहिण्याची परवानगी होती. यावेळी मी दोन पुस्तक लिहिली. मला जे अनुभव येत होते. ते लिहित होतो. तिथे काही पुस्तक होती. ती मी वाचत होतो. त्या पुस्तकाचा संदर्भ घेत मी दोन्ही पुस्तक लिहिली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, तसेच, शेवटच्या दिवशी बाहेर पडताना मला जेलच्या अधिकाऱ्यांनी पैसे दिले. मी तीन महिने पैसे पाहिले नव्हते. हे पैसे कसले असे विचारले असता.

हे पैसे तुमचे कमाई आहे असे त्यांनी सांगितले. तुमचे पैसे आमच्याकडे शिल्लक आहेत. आतमध्ये जगण्यासाठी मनी ऑर्डर पाठवले जातात. खाण्याचा पाण्याच खर्च असतो तो दिला जातो. त्यातुन हे राहिलेल पैसे आहेत.

मला एकएक रुपयाच महत्त्व, खाण्याच, पाण्याच, अथरुण, स्वातंत्र्य काय असत, जमीन, प्रकाश यासर्वांची जाणीव होते. तुम्ही एकांत वास भोगा, तिथं गेल्यावर विस्मरण होत.

समोरच्या व्यक्तीच नाव लवकर आठवत नाही. एकमहिन्यानंतर शब्द आठवत नाहीत. तुमची कपडे कुठे आहेत ते आठवत नाही असा थरारक अनुभव संजय राऊत यांनी सांगितला आहे.

Ahmednagarlive24 Office