आमदार निलेश लंके यांच्या ‘त्या’ भेटीचे वेगवेगळे अर्थ ..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार नीलेश लंके यांनी मुंबई विमानतळावर बुधवारी दुपारी काढलेले छायाचित्र (सेल्फी) तालुक्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. ही भेट योगायोगाने झाली असली तरी त्यातून वेगवेगळे अर्थ काढले.

लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचे सुतोवाच करणारी ध्वनिफीत समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फिरल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी पारनेर येथे येऊन तहसीलदार ज्योती देवरे यांच्याशी तासभर चर्चा केली. भारतीय जनता पक्ष देवरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे ठामपणे सांगितले. या पार्श्वभूमीवर आमदार लंके समर्थकांनी या छायाचित्राचा वापर भाजपच्या कार्यकर्त्यांना खिजवण्यासाठी केला.

देवरे प्रकरणात ‘भाजप दोन पावले मागे’ अशी टिप्पणीही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या चित्रा वाघ यांनी आमचे नेते देवेंद्र फडणवीस दोन पावले मागे नाहीत तर दोनशे पावल पुढे जाणारे आहेत. आम्ही तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार समाज माध्यमातून केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24