अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- डिजिटल हेल्थ कार्ड ही मानवी आरोग्य पत्रिकाच असून या सुविधे मुळे रुग्णालयाचे काम अधिक गतिमान होणार असल्याचे मनोगत आज प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी केले.
स्व. सिंधुताई विखे पाटील यांच्या स्मृतिदिना निमित्ताने प्रवरा रुग्णालयाच्या वतीने रुग्णाच्या सेवेत गतिमानता यावी यासाठी ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ ही सुविधा आज जनसेवेत दाखल करण्यात आली.
यावेळी राजेंद्र विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विष्णु मगरे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ राजवीर भालवार, ध्रुव विखे पाटील,वैद्यकीय अधीक्षक डॉ हेमंतकुमार, डॉ हेमंत पवार उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना डॉक्टर विखे पाटील यांनी या कार्डच्या माध्यमातून सर्व आरोग्य सेवा तुमच्या हातात कोणत्याही कागदा शिवाय उपलब्ध होणार आहे. सरकारी योजना, विमा आणि सर्व आरोग्य तपासणीचे रिपोर्ट आपणास याचा उपयोग होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.