ताज्या बातम्या

” तर अमित ठाकरे जातील फॉरेनला आणि इथे फक्त श्रद्धांजलीचे बोर्ड लागतील” दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर चौफेर फटकेबाजी

Published by
Renuka Pawar

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्याविषयी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

त्यानंतर त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत औरंगाबाद (Aurangabad) येथे भव्य सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे.

तसेच आता राज ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेना (Shivsena) नेत्या दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद म्हणाल्या ‘जे होईल ते होईल’ म्हणजे दंगली झाल्या तरी चालतील असं म्हटलं आहे. सभेसाठी गेलेल्या गाड्यांच्या ताफ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्याकडे ढुंकून न बघणारे साहेब…जर दंगली झाल्या तर प्रेत तरी बघायला येतील का? असा सवाल यावेळी सय्यद यांनी उपस्थित केला आहे.

दंगली झाल्या तर त्यात नुकसान फक्त सर्वसामान्य हिंदू आणि मुस्लिमांचं होणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. जर असं काही घडलं तर अमित ठाकरे (Amit Thackeray) जातील फॉरेनला आणि इथे फक्त श्रद्धांजलीचे बोर्ड लागतील अशी खोचक टीका दिपाली सय्यद यांनी केली आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, राज्यात सर्वकाही बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत.

ही राष्ट्रपती राजवट लागू व्हावी म्हणून कुठल्याही पातळीला जाऊन अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे.

महागाई सारखे अनेक विषय असताना ते विषय सोडून राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी तुम्ही जातीपातीच युद्ध करत आहात. त्यात लोकांना अडकवून हरवून ठेवलं असल्याचं सय्यद म्हणाल्या.

आपण आपल्या देवांना कुठे नेऊन ठेवलं आहे. देवाला आपण आज राजकारणातला एक मुद्दा बनवला आहे. हे राजकारण आहे का ? एकाठिकाणी भोंगा एका ठिकाणी हनुमान चालीसा हे सगळ पाहून वाईट वाटत असल्याचे सांगत सय्यद यांनी खंत व्यक्त केली आहे.

सगळीकडे शांती कायम राहायला पाहिजे. कारण या भोंगे आणि हनुमान चालीसाच्या भांडणात मोठी लोक मोठीच राहतील पण श्रद्धांजलीचे फोटो तुमचे लागतील असेही त्या म्हणाल्या आहेत.

दीपाली सय्यद यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला आहे. बाबरी मस्जिदवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा कुठे लपून बसले होते. फडणवीस तर पळताना दिसले होते.

त्यामुळे बाबरी मस्जिदच्या वेळी फक्त हिंदू आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. त्याच्या पलीकडे कोणी उपस्थित नव्हते. असेही दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.

तसेच त्यांनी अमृता फडणवीस यांनाही टोला लगावला आहे. अमृता फडणवीस आता माजी मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांचे सगळे व्यवसाय बंद झाले आहे.

त्यामुळे दुसऱ्यांकडे किती पैसे आहेत याकडे ढुंकून बघण्याची गरज नाही. त्यांनी न बोललेलंच बर त्यांना जर पुन्हा यायचं असेल तर त्यांनी त्याचं तोंड बंद ठेवाव अशी त्या म्हणाल्या आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar