वाहिनीवरच पडली दिराची वाईट नजर, नगर शहरातील घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- माणसाची वासना, शारीरिक भूक हि दिवसेंदिवस एवढी वाढत चालली आहे कि त्यांना नात्यांमधील प्रेम हे देखील समजत नाही.

आणि यामुळे नात्यांमधील अंतर दुरावत चालले असून अनेक गैरप्रकार यामाध्यमातून घडू लागले आहे.

नुकतेच नगर शहरातील एका उपनगरामध्ये राहणार्‍या 34 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या दीराने अत्याचार केला.

तर पतीने ही वारंवार अनैसर्गिक संभोग केला असल्याची फिर्याद पिडीत महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून तीचा पती व दिराविरोधात अत्याचार, अनैसर्गिक अत्याचार आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

जानेवारी 2021 पासून हा प्रकार सुरू असल्याचे पिडीताचे म्हणणे आहे. नगर शहरातील एका उपनगरात आपल्या पतीसह पिडीत महिला राहते.

त्या महिलेच्या इच्छेविरोधात पतीने तिचा वारंवार अनैर्गिक संभोग केला. तसेच दिराने ही अत्याचार केला असल्याचे पिडीताने फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोघां भावाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24