अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- भूषणनगर येथील सावली सोसायटीच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज लाईनचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे़. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे़ येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
परंतु या गंभीर समस्येकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. नुकतेच उपमहापौर गणेश भोसले यांनी भूषणनगर येथील सावली सोसायटीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गेल्या दहा वर्षांपासून या भागांमध्ये मनपाच्या कुठल्याही सुविधा नाहीत. आम्ही सर्व नागरिक घरपट्टी, पाणीपट्टी भरतो.
परंतु, पालिकेकडून कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. काहींनी चेंबरचे पाणी मोकळ्या जागेत सोडून दिल्यामुळे सर्वत्र मैलामिश्रित पाणी पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या भागात डेंग्यूचे विविध रुग्ण आढळून येत आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मैलामिश्रित पाणी मिक्स होऊन नळाला दुर्गंधीयुक्त वास येत आहे. पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. नागरिकांनी स्वखर्चाने पथदिवे बसविले आहेत. त्यावर रस्त्याच्या कामास लगेच सुरुवात केली जाईल. बंद पथदिवे सुरू करण्यात येतील.
ड्रेनेज लाईनचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. सुमारे २ किलोमीटरची मोठी ड्रेनेज लाईन टाकावी लागणार आहे. यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन या भागातील नागरिकांना भोसले यांनी दिले.