ताज्या बातम्या

iPhone 15 नंतर Apple iPhone 16 लॉन्चिंगची चर्चा ! ‘या’ तारखेला होणार लॉन्च, असतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स

Published by
Ahmednagarlive24 Office

iPhone 16 : आयफोन 15 लाँच झाल्यापासून आगामी आयफोन म्हणजेच आयफोन 16 ची चर्चा सुरू आहे. कंपनीने आयफोन 15 अनेक दमदार फीचर्ससह लॉन्च केला आहे, त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे अॅक्शन बटन. अॅपलने टाइप सी चार्जिंग सपोर्टसह आयफोन 15 लाँच केला आहे.

आता अॅपल आयफोन 16 मॉडेलमध्ये अतिरिक्त बटणे जोडण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. हे डिव्हाइस पुढील वर्षी (2024) लाँच होण्याची शक्यता आहे.

iPhone 16 मध्ये मिळतील खास फीचर
वीबो लीकर इन्स्टंट डिजिटलच्या माहितीनुसार, अपकमिंग iPhone 16 सीरिजच्या फोनमध्ये अतिरिक्त बटणे असू शकतात. रिपोर्टनुसार, अॅपल या बटणाला अंतर्गत “कॅप्चर बटण” म्हणत आहे, परंतु याचा वापर नेमका कशासाठी केला जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे बटण डिव्हाइसच्या उजव्या बाजूला पॉवर बटणाच्या खाली असेल आणि ते स्टँडर्ड बटणाऐवजी कॅपेसिटिव्ह बटण असेल. नवीन बटण आयफोन 16 च्या सर्व मॉडेल्सवर उपलब्ध असेल. iPhone 16 मॉडलमध्ये आयफोन iPhone 16 मॉडल व iPhone 16 प्लस मॉडेलचाही समावेश आहे.

अॅक्शन बटणात फ्लश डिझाइन असण्याची शक्यता
आयफोन 16 प्रो मधील अॅक्शन बटणात फ्लश डिझाइन असल्याचीही चर्चा आहे. सध्याच्या स्टँडर्ड बटन डिझाइनपासून दूर जात अॅपलने या बटणासाठी सॉलिड-स्टेट टेक्नॉलॉजीकडे जाण्याची योजना आखली आहे.

iPhone 15 pro
अॅपलने यावर्षी आपली आयफोन 15 सीरिज सादर केली आहे, ज्यात आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स मॉडेलचा समावेश आहे. कंपनीने प्रो मॉडेलमध्ये अॅक्शन बटन दिले आहे. यासोबतच कंपनीने पहिल्यांदाच सी टाइप चार्जिंग पोर्ट सपोर्टसह आयफोन आणला आहे. आता iPhone 16 ची उत्सुकता iPhone च्या चाहत्यांना लागलेली आहे.

iPhone ची क्रेझ
iPhone वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तरुणांमध्ये iPhone ची प्रचंड क्रेझ आहे. iPhone मध्ये असणाऱ्या अनेक सुविधा व फिचर्स तरुणांना भुरळ घालत असतात. iPhone 15 सीरिज प्रचंड लोकप्रिय झाली. आता iPhone 16 सीरिज ची तरुणांना उत्सुकता लागलेली आहे.

Ahmednagarlive24 Office