अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले असून, मागील काही दिवसांत तालुक्यात ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून,
बेलवंडी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह ४ कर्मचारी तसेच राजकीय नेते, शिक्षक, व्यापारी, पोलिस आणि शेतकऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली असून, जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.
श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढले असून, तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकासह ४ कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची माहिती आहे.
तालुक्यात मागील काही दिवसात ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, यातील ८ जण वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. कोरोनाने आतापर्यंत तालुक्यातील ४० ते ४५ जणांचे बळी घेतले आहेत.
यामध्ये राजकीय नेते, शिक्षक, व्यापारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकऱ्यांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज असून, नागरिकांनी माक्स वापरणे आवश्यक झाले आहे.
तसेच वेळोवेळी हात धुणे व गर्दीत जाणे टाळावे तसेच नियमित व्यायाम करून स्वत:ची रोगप्रतिबंधक शक्ती वाढवावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी केले आहे.