काळिमा फासणारी घटना : विद्यार्थिनीला सेक्स टॉय दिला आणि…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- टेक्सासमध्ये मध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासला आहे. येथे एका शिक्षकाने आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीचं शोषण केलं आणि त्यानंतर त्याने केलेलं कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

शिक्षकाने इंजेक्शन घेऊन तिच्या शरीरातील रक्त काढण्याचा प्रयत्न केला. आरोपी शिक्षक मार्क एलिसन याने आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीला अश्लील ई-मेल पाठवले होते.

या शिक्षकाने विद्यार्थिनीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता आणि तिला सेक्स टॉयदेखील आणून दिला होता.

कोर्टाने आरोपी शिक्षक मार्कला दोषी घोषित करीत दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मार्क, रॉकवालमधील केन मिडिल शाळेत ऑर्केस्ट्रा शिक्षक होता. मुलीला शिकवताना त्याने चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला होता.

निकालाची सुनावणी करण्यापूर्वी न्यायाधीशांनी सांगितलं की, आई-वडिलांना आपल्या मुलांसोबत वेळ घालवायला हवा.

त्यांच्यासोबत कोण कसं वागतं, त्याबद्दल सतत विचारत राहायला हवं. मुलांना गुड टच आणि बॅड टचविषयी सांगायला हवं.

ते पुढे म्हणाले की, शिक्षक मार्कने आपल्या पदाचा फायदा घेत धक्कादायक कृत्य केलं. त्याने शिक्षकांवरील पालकांचा असलेला विश्वास तोडला आहे. पीडितेने तिच्यासोबत झालेला प्रकार पालकांना सांगून मोठं काम केलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24