अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :-पाणीपुरी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. बाहेर कुठे फिरायला गेल्यावर पाणीपुरीवर ताव मारला जातो. मात्र, सध्या पाणीपुरी वाल्याचा एकी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या व्हिडीओमध्ये एका पाणीपुरी विक्रेत्याने पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये आपली लघवी टाकली आहे.एका युझर्सने हा व्हिडीओ सोशलवर टाकला आहे.
नेमकी काय आहे घटना? जाणून घ्या हा व्हिडीओ गुवाहाटीमधील आहे. या व्हिडीओमध्ये पाणीपुरीच्या ठेल्यावर एक माणूस दिसतोय. हा माणूस पाणीपुरी तयार करणारा आहे.
त्याने एका प्लास्टिकच्या मगमध्ये लघवी केल्याचे दिसत आहे. नंतर तीच लघवी त्याने खाली जमिनीवर आणि पाणी असलेल्या बकेटमध्ये टाकली आहे.
ज्या ठिकाणी लोकांना पाणीपुरी दिली जाते, त्याच ठिकाणी पाणीपुरीवाल्याने लघवी केली आहे. विशेष म्हणजे बकेटमधील पाणी नंतर प्लेट धुण्यासाठी वापरले जात आहे.
या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडाल्यामुळे पोलिसांनी या पाणीपुरीवाल्याला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.