Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Disney+ Hotstar : डिस्ने+ हॉटस्टार वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! 31 मार्चनंतर असा कंटेंट पाहता येणार नाही

सध्या डिस्ने+ हॉटस्टार वापरणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर आहे. आता याच वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण आता त्यांच्या आवडीचा काही कंटेंट त्यांना पाहता येणार नाही.

Disney+ Hotstar : अनेकजण डिस्ने+ हॉटस्टारचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही टीव्ही मालिकांपासून ते चित्रपट पाहू शकता. परंतु, आता या वापरकर्त्यांना डिस्ने+ हॉटस्टारने एक वाईट बातमी दिली आहे. त्यामुळे वापरकर्ते निराश झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण आता त्यांच्या आवडीचा HBO कंटेंट त्यांना पाहता येणार नाही. याबाबत डिस्ने+ हॉटस्टारने यापूर्वीच माहिती दिली होती. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेक वापरकर्त्यांना धक्का बसला आहे. 31 मार्चनंतर म्हणजे परवापासून त्यांना हा कंटेंट पाहता येणार नाही.

समजा तुम्ही Disney+ Hotstar चे सदस्य असाल तसेच तुमच्याकडे अजूनही काही HBO सामग्री तुमच्या वॉचलिस्टमध्ये बाकी असल्यास लवकरात लवकर ती पहा. कारण आता 31 मार्चनंतर, HBO ची मूळ सामग्री OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार नाही . Disney+Hotstar ने याबाबत या महिन्याच्या सुरुवातीला याची दिली होती. गेम ऑफ थ्रोन्स, हाऊस ऑफ द ड्रॅगन, द टाइम ट्रॅव्हलर्स वाईफ आणि नुकताच रिलीज झालेला शो, द लास्ट ऑफ अस असे शो यापुढे पाहता येणार नाहीत.

गमावणार Disney+Hotstar HBO कंटेंट

याबाबत डिस्ने + हॉटस्टारच्या अधिकृत पृष्ठाने 7 मार्च रोजी ट्विट एक केले होत, ’31 मार्चपासून, डिस्ने + हॉटस्टारवर HBO सामग्री उपलब्ध होणार नाही. परंतु तरीही तुम्ही Disney+ Hotstar च्या विशाल लायब्ररीचा आनंद घेऊ शकता, ज्यात 10 भाषांमधील 100,000 तासांपेक्षा जास्त टीव्ही शो आणि चित्रपट आणि प्रमुख जागतिक क्रीडा स्पर्धांचे कव्हरेज याचा समावेश असणार आहे.’

कोठे पाहता येणार HBO कंटेंट?

हे लक्षात घ्या की HBO शो यापुढे Disney + Hotstar सदस्यत्वाचा भाग असणार नाही, परंतु तरीही HBO शो पाहता येणार आहे. HBO कंटेंट इतर सदस्यत्वांचा भाग म्हणून Amazon Prime वर उपलब्ध असणार आहे. परंतु, अजूनही याबाबत कंपनीकडून अधिकृतपणे जाहीर केले नाही.