अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना ऑक्सिजन, रेमडीसिवीरचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात जो साठा उपलब्ध आहे.
त्यातील शासकीय रुग्णालयाला किती ठेवायचा आणि खाजगी रुग्णालयांना किती द्यायचा यावरून प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. शुक्रवारी ऑक्सिजनच्या एका टँकरमधील ऑक्सिजन वाटपावरून वाद झाल्याचे पुढे आले आहे.
जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या एका टँकरमधील ऑक्सिजनच्या वाटपावरून खाजगी डॉक्टर्स आणि जिल्हा रुग्णालयात वादा झाला.
उपलब्ध झालेल्या एक टँकर जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात आल्यानंतर तो तिथेच संपूर्ण खाली करून घेतला जाणार असल्याची माहिती खाजगी कोविड हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांना समजली.
यानंतर खाजगी डॉक्टरांनी एकत्र येत विरोध केला, यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याबाबत खाजगी डॉक्टरांनी ऑक्सिजन मिळाला नाही तर आम्हाला कोविड रूग्ण ऍडमिट कसे करून घेता येतील असा प्रश्न उपस्थित केला आहे.या वादाबाबत सरकारी अथवा खासगी डॉक्टर यापैकी कोणाकडूनच दुजोरा मिळाला नाही.