अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- बर्थडे पार्टी तसेच कोविड कार्यकाळात अपेक्षित काम केले नसल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी महानगरपालिकेचे वैदकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
दरम्यान आता बोरगे यांच्या जागी वैदकीय आरोग्य अधिकारी म्हणून डॉक्टर सतीश राजूरकर यांची नियुक्ती करण्याचे आदेश महापालीका शंकर गोरे यांनी दिले होते .
त्यावरूनच डॉक्टर सतीश राजूरकर यांनी महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा पदभार हाती घेतला आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत वैद्यकीय आरोग्य अधिकारी बोरगे यांनी दालनात वाढदिवस साजरा केला होता.
याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना नोटीस बजावली होती. बोरगे यांना २४ तासात खुलासा सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता.
मात्र डॉक्टर अनिल बोरगे यांच्याकडून काही खुलासा करण्यात आला नसल्याने त्यांना अखेर महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सक्तीच्या रजेवर पाठविला .