शेतीच्या वादातून भावकीमध्ये वाद; कुटुंबियांवर केला जीवघेणा हल्ला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  शेतातील पाईपलाईनवर कोणीतरी बैलगाडी घातली त्याचा राग आल्याने नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील तिघांच्या डोक्यात फावड्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

असून याबाबत भाग्यश्री विशाल काळे (वय 26) धंदा-वैद्यकीय व्यवसाय रा. माळीचिंचोरा ता. नेवासा या महिलेने फिर्याद दाखल केली आहे.

या दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात तिघांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान सदर महिलेने फिर्यादीत म्हटले की, मी वरील ठिकाणी पती विशाल रमेश बोरुडे, सासरे रमेश रंगनाथ बोरुडे, सासू मिरा रमेश बोरुडे, दिर निखील रमेश बोरुडे असे एकत्र कुटूंब माळीचिंचोरा शिवारात राहतो.

शेजारीच चुलत सासरे दत्तात्रय रंगनाथ बोरुडे हे कुटूंबियांसह राहतात. 6 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पाईपलाईन वरुन कोणीतरी बैलगाडी घातल्याचा राग मनात धरून दत्तात्रय बोरुडेने आमच्या घरासमोर येवून शिवीगाळ करुन आमच्या कुटुंबियांना लोखंडी फावड्याने मारहाण केली.

यामध्ये कुटुंबियांना गंभीर दुखापत केली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी दत्तात्रय रंगनाथ बोरुडे, आशाबाई दत्तात्रय बोरुडेे व संकेत दत्तात्रय बोरुडे यांचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24