निंबळकच्या मातोश्री कोविड सेंटरला मिष्टान्न भोजनाचे वाटप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- निंबळक (ता. नगर) येथील मातोश्री कोविड सेंटर मधील रुग्णांना सामाजिक कार्यकर्ते दत्तू (राजू) रोकडे यांच्या वतीने मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच प्रियंका लामखडे, उद्योजक केतन लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्या मालन रोकडे, कोमल शिंदे, सौ. गायकवाड, माऊली रोकडे, पै. नाना डोंगरे,

सचिन राठोड, सुनिल सकट, मच्छिंद्र म्हस्के, दादा साठे आदी उपस्थित होते. दत्तू (राजू) रोकडे म्हणाले की, कोरोनाच्या लढ्यात माणुसकीच्या भावनेने एकमेकांना आधार देण्याची गरज आहे.

ग्रामीण भागात सुरु करण्यात आलेले कोविड सेंटर सर्वसामान्यांसाठी आधार ठरत आहे. या आरोग्य मंदिरांना हातभार लावण्याची गरज असून,

स्व.भिमा गोविंद रोकडे यांच्या स्मरणार्थ कोविड सेंटरमध्ये मिष्टान्न भोजन वाटपाचा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.

सरपंच प्रियंका लामखडे यांनी नागरिकांना कोरोनाचे वेळेवर उपचार न मिळून लवकर बरे होण्यासाठी निंबळक मध्ये कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली.

यामध्ये सर्वसामान्य वर्गातील रुग्ण उपचार घेत आहेत. सेवाभावाने सुरु असलेल्या या कार्यास रोकडे यांनी केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24