अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-गरजवंत मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा शक्ती असते मात्र पारिस्थती आडवी येते.
ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली पाहिजे. या मुलांना चांगले शिक्षण मिळाले तर उच्च पदावर जातील. गरीब मुलांना मदत करणे हे सर्वात पुण्याचे काम आहे असे प्रतिपादन आ.निलेश लंके यांनी केले
नगर तालुक्यातील अकोळनेर येथे उपसरपंच प्रतिक शेळके यांनी आ.लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील गरजवंत दोनशे विद्यार्थ्यांना दीड लाख रूपयांचे शालेय साहित्य वाटप केले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी लंके म्हणाले मतदार संघातील अकोळनेर गाव मी दत्तक घेतले असून, पाच वर्षात गावाचा पुर्ण विकास करणार आहे.
प्रतिक शेळकेने उपसरपंच पदाची सुत्र हातात घेतात गरजवंत मुलांना शेक्षणिक साहित्य देऊन चांगल्या कामाची सुरवात केली आहे. येथील नागरिकासाठी सत्तर लाख रुपयाचे मंगल कार्यालय उभारणार आहे.
मी आमदार असलो तरी एक साधा कार्यकर्ताच राहणार आहे असे या वेळी म्हणाले. या कार्यक्रमास गावातील विविध मान्यवरासह नागरिक उपस्थित होते.