अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-छत्रपती शिवरायांनी शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. शिवाजी महाराज अतिशय धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण संपन्न होते.
सर्वसामान्य रयतेवर अन्याय होऊ नये, त्यांचे हक्क अबाधित रहावे, म्हणून त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या कार्यातून व विचारातून आजच्या युवकांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली), जय असोसिएशन ऑफ एनजीओ, आधारवड बहुद्देशीय संस्था,
रयत प्रतिष्ठान, जय युवा अॅकॅडमी, द युनिव्हर्सल फाउंडेशन, उडान फाउंडेशन, उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था, माहेर फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे राज्य अध्यक्ष संदीप लोंढे,
लीगल सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष अॅड. प्रशांत साळुंके, नगरसेवक प्रकाश भागानगरे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भानुदास होले, जिल्हाध्यक्ष अॅड. महेश शिंदे, अॅड. अनिता दिघे, शिवाजी नवले, पोपट बनकर, शामू लोंढे, श्रीकांत यादव, सागर आलचेट्टी, रजनी ताठे, नयना बनकर, आरती शिंदे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जगताप यांनी मानवी हक्क, अधिकार व कर्तव्याबाबत जागृक राहण्याचे सांगत राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या कार्याचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते डॉ. अमोल बागुल, रजनी ताठे, अशोक भालके, जगन्नाथ बोडखे, प्रा.सुनिल मतकर, शरद वाघमारे, ज्योत्स्ना शिंदे, संगीता घोडके, डॉ.धीरज ससाणे, डॉ.चंद्रकांत वाल्हेकर, सुहासराव सोनवणे, मेधा कानिटकर, ईसाभाई शेख, ऋषिकेश कावरे, विद्या तन्वर, शोभा निसळ, सचिन वायाळ यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले.
तसेच सुनील सकट, प्रा. सुनील मतकर, प्राचार्य मिनीनाथ गोरे, मुख्याध्यापक लहानु कोरडे, परमेश्वर जवणे, विठ्ठल क्षीरसागर, प्राचार्य डॉ. रामदास बिटे, ग्रामसेवक अनिल केसकर, तेजल परमार, रमाकांत माटे यांना टॅलेंट ऑफ आमदनगर पुरस्कार देण्यात आले. तर सर्व उपस्थितांना शिवचरित्राचे पुस्तक भेट देण्यात आल्या संदीप लोंढे म्हणाले की,
जीवन आनंदाने व निर्भयपणे जगण्यासाठी मानवाधिकारांची माहिती असणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मानवाधिकारांच्या मुल्यांचा आदर राखला गेला पाहिजे. मनुष्य मनुष्याच्या मदतीला येण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहून मानवी मुल्यांच्या जागृती व मानवाधिकारांचे उल्लंघटन टाळण्यासाठी कार्य करीत असल्याचे सांगितले.
अॅड. प्रशांत साळुंके यांनी कोरोना महामारी मनुष्यावर ओढवलेली सर्वात मोठी आपत्ती होती. सर्वांनी माणुसकीची भावना जागृक ठेऊन एकजुटीने कार्य केल्याने अनेकांचे जीव वाचले. अनेकांनी या संकटकाळात आपल्या परीने कार्य करुन एका योध्दाची भूमिका पार पाडली.
या पुरस्कार व सन्मानाने सामाजिक कार्य करणार्यांना आनखी बळ मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अनिता दिघे यांनी केले.
आभार अॅड. भानुदास होले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेजर नारायाण चिपडे, शाहिर कान्हू सुंबे, अॅड. सुनिल तोडकर, दिनेश शिंदे, संतोष गिर्हे, दर्शन बनकर, साक्षी बनकर यांनी परिश्रम घेतले.