अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-वाढते ऊन व कोरोना संक्रमणाच्या संरक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने शहरातील हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांना छत्री व मास्क वाटप उपक्रमाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.
माळीवाडा बस स्थानक व जुनी महापालिका येथील रस्त्यावर व्यवसाय करणार्या कष्टकरी बांधवास छत्री व मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफिक मुन्शी, सचिव सुयोग झंवर, नगरसेवक आसिफ सुलतान, उद्योजक पै.अफजल शेख, डॉ. रिजवान अहेमद, अय्युब खान आदींसह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मागील वर्षी झालेल्या टाळेबंदीत सर्वसामान्य हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांना उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना रोटरी सारख्या विविध सामाजिक संघटनांनी आधार देण्याचे कार्य केले.
सध्या देखील कोरोनाचे संक्रमण व उन्हाची तीव्रता वाढत असताना हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधव घटक दुर्लक्षीत राहू नये या भावनेने रोटरी इंटिग्रिटीच्या वतीने घेतलेला उपक्रम प्रेरणादायी आहे.
रोटरीने माणुसकीच्या संवेदना जपण्याचे कार्य केले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफिक मुन्शी म्हणाले की, कष्टकरी बांधव मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे.
त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने त्यांचे ऊन, पाऊस व कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी रोटरी इंटिग्रिटीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे स्पष्ट करुन,
शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कष्टकरी बांधवांना छत्री व मास्क देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
रणरणत्या उन्हात व्यवसायासाठी डोक्यावर छत्रीच्या रुपाने सावली दिल्याबद्दल लाभार्थींनी रोटरीचे आभार मानले.