अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्था मतदार संघात १०५ पैकी तब्बल ९३ मतदार आमदार नीलेश लंके तसेच माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी मतदानाला आल्याने उमेदवार उदय शेळके यांचा एकतर्फी विजय निश्चित झाला आहे.
बिगरशेती मतदार संघातही प्रशांत गायकवाड यांना एकूण मतदानापैकी ९५ टक्के मतदारांनी कौल दिल्याचे चित्र आहे. सेवा संस्था तसेच बिगरशेती मतदार संघातील उमेदवारांसाठी एकतर्फी मतदान घडवून आणण्यासाठी आमदार नीलेश लंके यांची चाणक्य निती फळाला आल्याचे माणले जात आहे.
जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक जाहिर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने सेवा संस्थ मतदार संघातून उदय शेळके तर बिगरशेती मतदार संघातून प्रशांत गायकवाड यांच्या उमेदवारीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दिला. गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी आ. अरूण जगताप यांची उमेदवारीही डावलण्यात आली.
तालुका पातळीवर उदय शेळके तर जिल्हा पातळीवरील मतदार संघात निवडणूक लढवित असलेल्या प्रशांत गायकवाड यांना मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी आ. नीलेश लंके यांच्यावर सोपविण्यात आली होती. सेवा संस्था मतदार संघात आ. लंके यांनी शिवसेनेला खिंडार पाडीत शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष भाउसाहेब भोगाडे,
अशोक कटारिया, पळशीचे उपसरपंच अप्पासाहेब शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रदीप वाळूंज, कळसचे महादेव गाडगे, भांडगांवचे दत्ता खरमाळे यांना राष्ट्रवादीकडे आकर्षीत करण्यात आ. लंके यांनी यश मिळविले तर सुजित झावरे समर्थक डॉ. नितिन रांधवन, नवनाथ बिचारे यांनाही राष्ट्रवादीकडे आकर्षीत करीत आ. लंके यांनी बेरजेचे राजकारण केले.
सेवा संस्था तसेच बिगर शेती मतदार संघात अनुक्रमे उदय शेळके व प्रशांत गायकवाड यांना एकतर्फी मतदार घडवून आणण्यात यश मिळवितानाच आ. लंके यांनी प्रशांत गायकवाड यांच्यासाठी जिल्हयातील मतदारांशीही संपर्क साधत गायकवाड यांचे मताधिक्य वाढविण्याची खबरदारी घेतली.