अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- जिल्हा बँकेचे २१ पैकी १७ जागा आधीच बिनविरोध झालेले आहेत.यात सोसायटी मतदार संघातील तीन आणि बिगरशेती मतदारसंघातील १ जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यात विद्यमान आमदार रोहित पवार यांना झटका बसला आहे.
कर्जत मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे जोरदार चुरस दिसून आली. विखे गटाच्या अंबादास पिसाळ यांना ६७ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या मीनाक्षी साळुंके यांना ३६ मते मिळाली. साळुंके यांच्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठी ताकद लावली होती. त्यांना अवघ्या एका मताने पराभवाचा सामना करावा लागला.
सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील तीन जागांवर माजी मंत्री शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे उदय शेळके व विखे गटाचे अंबादास पिसाळ हे विजयी झाले. उदय शेळके व शिवाजी कर्डिले यांनी एकतर्फी विजय मिळवला. पारनेर मतदारसंघातून उदय शेळके यांना १०५ पैकी तब्बल ९९ मते मिळाली.
विरोधी असलेल्या शिवसेनेच्या भोसले यांना अवघी ६ मते मिळाली. नगर तालुका मतदारसंघातून १०९ मतदारांपैकी शिवाजी कर्डिले यांना ९४ मते मिळाली, तर सत्यभामाबाई बेरड यांना १५ मते मिळाली. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचा एक तर्फी विजय झाला.
जिल्हा बँकेच्या बिगर शेती मतदारसंघातून गायकवाड यांना ७६३ तर विरोधी पानसरे यांना ५७४ मते मिळाली यात जिल्हा बँकेचे संचालक व श्रीगोंद्यातील दत्तात्रय पानसरे यांचा दारुण पराभव झाला आहे, पारनेर चे प्रशांत गायकवाड यांनी तब्बल १८९ मतांनी पानसरे यांचा पराभव केला आहे.