अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. यातच संबंधित अधिकारी जिल्हा दौरे करत आहे.
यातच निघोज (ता.पारनेर) येथील संदीप पाटील कोविड सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद भोसले यांनी नुकतीच पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी मेडिकल चालक , डॉक्टर, लॅब चालक यांना महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
यावेळी बोलताना भोसले म्हणाले कि, पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी दवाखाने व खासगी लॅब चालकांनी रुग्णांना कोरोनाबाबतची काही लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करण्यास सांगावे.
तपासणीमध्ये व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यास त्यांना घरी न पाठवता त्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवावे. तसेच याबाबतची माहिती प्रशासनास तत्काळ द्यावी.
अशा रुग्णांना परस्पर औषधे देऊन घरी पाठविणाऱ्या डॉक्टर व लॅबवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिला.