अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ पोलीस स्टेशनचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून सन्मान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  अकोले येथील राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याबद्दल राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे सहायक फौजदार नितीन खैरनार ,पोलीस हवालदार नेहे,पोलीस नाईक मुंढे,

पोलीस अमलदार,अशोक गाढे,प्रवीण थोरात,-अशोक काळे, दिलीप डगले,मनोहर मोरे, विजय फटांगरे , राकेश मुलाने, पांडुरंग पटेकर या टीमने गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून २ दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

त्या बद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर येथे राजूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी वर्गाचा सत्कार केला. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे मॅडम उपस्थित होत्या.

पेंडसेत येथील वृध्द महिलेच्या डोक्यात दगड मारून वृध्द महिलेला ठार मारले होते तसेच आरोपी हा जंगलात जाऊन लपून बसला होता त्यास शिताफीने चोवीस तासात पकडले. तसेच खडकी येथे झालेल्या भांडणातून खुन झाला होता

सदर आरोपी यांना चार तासातच शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे या कारवाई बद्दल कौतुक केले आहे तसेच विविध गुन्हे मध्ये तातडीने तपास लावलेमुळे

जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दखल घेत नगर येथे या टीमला बोलून सर्व राजूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांचे कामगिरीचे कौतुक केले.

अहमदनगर लाईव्ह 24