अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे दिव्यांग बांधव राहत असून, या दिव्यांग बांधवांचे नोंदी अद्याप पावेतो महापालिकेने त्यांच्या रेकॉर्डला घेतलेला नाही. दिव्यांगाच्या सर्वांगिन विकासाकरीता केवळ सहानभुतीचा दृष्टीकोन न ठेवता त्यास संवाधिक आधार कसा मिळेल हे पहावे.
दिव्यांग कायद्याप्रमाणे दिव्यांगाच्या कल्याणसाठी 5 टक्के निधी अपंग कल्याणार्थ राखून ठेवणे गरजेचे आहे. सदर निधीचा उपयोग दिव्यांगांना होणेकरीता दिव्यांगांची पालिकेमध्ये नोंद होणे ही अतिशय गरजेचे आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय नगर विकास विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे जन्म-मृत्यू नोंदीप्रमाणे अपंगाची नोंद अहमदनगर महानगरपालिकेमध्ये करणे अत्यंत आवश्यक असतांना महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असून,
तरी दिव्यांग बांधवांनी स्वत:हून महानगरपालिकेमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकाडे व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे घेऊन
महापालिकेतील दिव्यांग कक्षाशी मो.8308330827 या नंबरवर संपर्क करुन आपली करुन घ्यावी, असे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे अॅड.लक्ष्मण पोकळे यांनी केले आहे.