Diwali : भारतातील ‘या’ राज्यात कधीच साजरी होत नाही दिवाळी, जाणून घ्या यामागचे कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diwali : भारतात दरवर्षी वेगवेगळे सण (Festival in India) साजरा केले जातात. येत्या 24 ऑक्टोबर रोजी भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी (Diwali 2022) साजरा केली जाईल.

परंतु, भारतातील काही राज्यात कधीच दिवाळी (Deepavali) साजरी केली जात नाही. या राज्यात दिवाळी (Deepavali 2022) सोडून सगळे सण साजरा करतात.

वास्तविक भारतातील दक्षिणेकडील केरळ (Kerala) राज्यात दिवाळी साजरी होत नाही. केरळमध्ये दिवाळी (Diwali in Kerala) साजरी होत नाही हे फार कमी लोकांना माहीत असेल. इथले लोक ना लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात ना फटाके वाजवतात. इथे लोकही दिवे लावत नाहीत.

खरंतर केरळमधील लोक दिवाळी वगळता सर्व सण उत्साहात साजरे करतात.केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्यामागे अनेक कारणे आहेत. वास्तविक, केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे केरळमध्ये महाबली हा राक्षस राज्य करत होता आणि त्याची येथे पूजा केली जाते.

दिवाळी साजरी करण्यामागचे कारण रामाचा रावणावर झालेला विजय हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा स्थितीत केरळमधील लोक इथल्या राक्षसाच्या पराभवाचा आनंद साजरा करत नाहीत.

केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्याचे दुसरे कारण म्हणजे येथे हिंदू धर्माचे लोक खूप कमी आहेत. याच कारणामुळे या राज्यात दिवाळी साजरी होत नाही. त्याचवेळी, आणखी एक कारण आहे की ऑक्टोबर महिन्यात केरळमध्ये भरपूर पाऊस पडतो, अशा परिस्थितीत फटाके आणि दिवे पेटवता येत नाहीत.

तर केरळमध्ये फक्त कोचीमध्येच दिवाळी (Diwali in Kochi) साजरी केली जाते. वास्तविक, केरळ व्यतिरिक्त तामिळनाडूमध्येही दिवाळी साजरी केली जात नाही. तामिळनाडूतील लोक यावेळी नरका चतुर्दशी साजरी करताना दिसतात.

भारतातील इतर राज्यांमध्ये दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशासोबतच देवी सरस्वतीचीही दिवाळीत पूजा केली जाते.