Diwali Muhurat Trading 2023 : रिलायन्स सिक्युरिटीजने ‘या’ दहा शेअर्सवर पैसे लावण्याचा दिलाय सल्ला, व्हाल मालामाल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Diwali Muhurat Trading 2023 : सध्या तरुणांमध्ये शेअर मार्केटविषयी जास्त जागरूकता निर्माण झाली आहे. अनेक तरुण यात गुंतवणूक करतात. दीर्घ कालावधीत गुंतवणूक केल्यास यात नक्कीच फायदा होतो. आता उद्या दिवाळी. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा दिवस खूप महत्चाचा आहे.

याचे कारण हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी अनेक लोक या शुभमुहूर्तावर शेअर्स खरेदी करत असतात. याठिकाणी आपण रिलायन्स सिक्युरिटीज यांनी सांगितलेल्या 10 शेअर्सबद्दल जाणून घेऊ. या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास 27 टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चला या दहा शेअर्सविषयी जाणून घेऊयात –

डिवीज लॅब
या कंपनीचे कॅपिटल स्ट्रक्चर एकदम स्ट्रॉंग आहे. हायपरटेन्शन सेगमेंटमध्ये कंपनी आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. तसेच रेडिओलॉजीवर ही त्यांनी फोकस केले आहे. ब्रोकरेज कंपनीने हा शेअर 3850 रुपयांच्या टार्गेटसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीपेक्षा ही किंमत 9 टक्क्यांनी जास्त आहे.

एलटीआईमाइंडट्री
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कंपनीचे ऑर्डर बुक एकदम स्ट्रॉंग आहे. त्यांच्या अॅक्टिव्ह ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. मागील काही वर्षांतील कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जर आपण पाहिलं तर ते 18 टक्क्यांच्या वर आहे. या सगळ्याचा विचार करून रिलायन्स सिक्युरिटीजने हे शेअर्स 5925 रुपयांच्या टार्गेटसह ते खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 15 टक्क्यांनी जास्त आहे.

IDFC फर्स्ट बँक
या बँकेची ब्रॅण्डव्हॅल्यू वाढली आहे. या बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली आहे. हे पाहता ब्रोकरेजने हे शेअर 105 रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीनुसार हा सुमारे 27% रिटर्न असेल.

अंबुजा सिमेंट
ब्रोकरेज कंपनीने हा शेअर 495 रुपयांच्या टार्गेट प्राइससह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा ही किंमत 18 टक्क्यांनी अधिक आहे.

एचडीएफसी बँक
रिलायन्स सिक्युरिटीजने एचडीएफसी बँकेचा शेअर 1,775 रुपयांच्या टार्गेटसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीपेक्षा ही किंमत 19 टक्क्यांनी जास्त आहे. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, एचडीएफसीसोबत बँक मर्ज प्रक्रिया आता पूर्ण झाल्यानंतर बँकेला आपली प्रगती करण्यासाठी आणि अनेक रिटेल सेगमेंटमध्ये आपला हात अजमवण्याची मोठी संधी आहे.

हिरो मोटोकॉर्प
हिरो मोटोकॉर्प ही एक मोठी कंपनी आहे. आता या कंपनीने इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये आता आपले ठेवले आहे. त्यासाठी एथर एनर्जीमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. ब्रोकरेज कंपनीने हा शेअर 3620 रुपयांच्या टार्गेट प्राइससह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीपेक्षा हा शेअर 14 टक्क्यांनी अधिक आहे.

नवीन फ्लोरीन
मार्केटमधील ही कंपनी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चून नवीन प्लांट उभारत आहे. नवनवीन प्रोडक्ट लाँच करत आहेत. हे सर्व पाहता, रिलायन्स सिक्युरिटीजने ते रु. 4,300 रुपयांच्या टार्गेटवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ते त्याच्या सध्याच्या किंमतीनुसार सुमारे 18% जास्त आहे.

UPL
ही कंपनी बॅकवर्ड इंटीग्रेशन व सप्लाई चेन मॅनेजमेंट सुधारण्यावर सध्या भर देत आहे. रिलायन्स सिक्युरिटीजने हा शेअर 700 रुपयांच्या टार्गेटसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे सध्याच्या किंमतीपेक्षा 26 टक्के अधिक आहे.

EPL
कंपनी टिकाऊ पॅकेजिंग सोल्यूशन्स तयार करते. कंपनीकडे सुमारे 89 पेटंट्स आहेत. कंपनी ब्राझीलमध्ये आपले पाय रोवत आहे. हे पाहता रिलायन्स सिक्युरिटीजने 228 रुपयांचे लक्ष्य ठेवून हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे सध्याच्या बाजारभावापेक्षा 17% जास्त आहे.

हॅपीएस्ट माइंड्स
कंपनी सातत्याने मर्जरएंडएक्विजिशनच्या संधी शोधत आहे. ब्रोकरेजने या शेअरसाठी 960 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे, जे सध्याच्या किंमतीवर सुमारे 16 टक्के जास्त परतावा देऊ शकते.

अहमदनगर लाईव्ह 24