अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याने २०२०-२१ या वर्षात सर्वांच्या सहकार्याने ऊसाचे उच्चांकी गाळप करून हंगाम यशस्वी केला आहे.
तसेच यंदा कारखान्याने १४ लाख ५१ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले. कारखान्याने राज्यात चौथ्या क्रमांकाचे ऊस गाळप केले, असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांनी दिली.
लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा ४७ वा गळीत हंगाम सांगता समारंभ बुधवारी झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी घुले म्हणाले, सर्व ऊस उत्पादक, कारखाना कामगार, ऊसतोड कामगार, वाहतूकदार, संचालक मंडळ यांच्या सहकार्याने १४ लाख ५१ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून
१५ लाख ६१ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले. या हंगामात १० कोटी ५० लाख युनिट वीज निर्मिती झाली.
६ कोटी ६१ लाख युनिट वीज निर्यात केली आहे. कारखाना ही मातृसंस्था असून त्यावर अनेकांचे प्रपंच अवलंबून आहेत, असे त्यांनी सांगितले.