Fixed Deposit : अनेकजण भविष्यासाठी गुंतवणूक करतात. त्यांच्या कष्टाचे पैसे सुरक्षित आणि चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी ते गुंतवणुकीस प्राधान्य देतात. काही जण मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतात.
कारण बँकेच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा मुदत ठेवींमध्ये चांगला नफा मिळतो. जर तुम्ही FD करत असाल तर काही चुका टाळणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल.
FD हा देशातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे कारण तो जोखीममुक्त आहे आणि परताव्याची हमी देतो. ही अशी गुंतवणूक आहे ज्यामध्ये ग्राहक विशिष्ट कालावधीसाठी ठराविक रक्कम खात्यात जमा करतो आणि त्यावर व्याज मिळवतो.
एफडीमध्ये जमा केलेली रक्कम लॉक केली आहे. हा लॉक-इन कालावधी केवळ FD करणार्या व्यक्तीद्वारे निवडला जातो. मात्र, मुदतपूर्तीपूर्वी एफडी मोडल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.
जेव्हा लोक एफडी करून घेतात तेव्हा लोकांना अचानक पैशांची गरज भासते असेही अनेक वेळा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत लोक काहीही विचार न करता एफडी तोडतात. मात्र, मुदतपूर्तीपूर्वी एफडी मोडली गेली आणि त्यातून पैसे काढले गेले, तर दंड भरावा लागतो.
FD मधून मुदतपूर्व पैसे काढले जाऊ शकतात, परंतु अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला दंड भरावा लागतो. त्यामुळे FD वर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवरही परिणाम होतो.
दुसरीकडे, जर लोकांनी मुदतपूर्व FD बंद करून पैसे काढले, तर बहुतेक बँका त्यावर शुल्क आकारतात आणि व्याजदराच्या 0.5% आणि 1.00% दरम्यान दंड म्हणून दंड आकारला जातो.