Vastu Tips : नोटा मोजताना चुकूनही करू नका ही चूक अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज

Vastu Tips : आजकाल सर्वच गोष्टी पैशाने कराव्या लागत आहेत. पैसा मानवाच्या जीवनातील महत्वपूर्ण घटक बनला आहे. पैसा कोणाला नको आहे, पैसे तर सर्वानाच हवा आहे. मात्र पैसे येण्याचे आणि जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. मात्र पैसे मोजताना काही चुका केल्या जातात त्या कधीही करू नयेत.

आपले पाकीट आणि घराची तिजोरी नेहमी भरलेली असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. त्याची पूजा केल्याने वैभव, ऐश्वर्य, सुख-समृद्धी वाढते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पण लक्ष्मी देवी कोपली तर राजाही कोपतो. शास्त्रात असे म्हटले आहे की धनाची देवी लक्ष्मी नेहमी स्वच्छ ठिकाणी वास करते. ज्या घरामध्ये घाण असते त्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते आणि मग गरिबी येते.

कळत नकळत, पण अनेक वेळा माणसाकडून अशा चुका होतात, ज्यामुळे तो पुढे अडचणीत येतो आणि संकटातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. चला तुम्हाला सांगतो पैशाने कोणत्या चुका करू नयेत.

जर तुम्ही कोणत्याही गरीब किंवा गरजूला पैसे दिले तर ते पूर्ण सन्मानाने आणि आरामाने द्या. पैसे फेकून दिल्याने माता लक्ष्मी रागावते.

अनेकदा लोक थुंकून नोटा मोजतात. मात्र असे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो. त्यामुळे ही सवय लगेच सोडा. नोटा मोजण्यासाठी नेहमी पावडर किंवा पाणी वापरा.

पैशात लक्ष्मीचा वास असल्याने रस्त्यात कुठेतरी पैसे पडलेले दिसले तर ते उचलून आधी कपाळावर लावून नमस्कार करावा.

पलंगावर किंवा उशीवर कधीही पैसे ठेवू नका. त्यांना स्वच्छ ठिकाणी किंवा वॉल्टमध्ये ठेवा. लक्ष्मीचे पैसे सोबत ठेवणे चांगले मानले जाते. यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

अन्नपदार्थ कधीही पैशासोबत ठेवू नका. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये पैसे ठेवले असतील तर त्यामध्ये खाद्यपदार्थ ठेवू नका. यातून पैशाचा अपमान होतो.