अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- कोरोनाची तपासणी करण्यासाठी RT -PCR चाचणी केली जाते. मात्र चाचणीतही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही तर रुग्णांकडून CT Scan केला जातो.
आता याच मुद्द्यावरून वरिष्ठ डॉक्टर यांनी एक महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
स्वास्थ मंत्रालयाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिटी स्कॅनचा वापर विचार करुन करा. CT Scan म्हणजे ३०० चेस्ट X-Ray च्या बरोबरीचा आहे, हे अत्यंत हानिकारक आहे.
तसेच कॅन्सरचा धोकाही संभवू शकतो, अस त्यांनी सांगितलं. बऱ्याचदा सौम्य लक्षणे असणारे रुग्ण RT-PCR टेस्ट मधून कोरोनाचे निदान न झाल्यास रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेऊन CT- SCAN करतात.
कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांकडून CT -SCANचा दुरूपयोग केला जात असल्याचे डॉ. गुलेरीया यांनी सांगितले आहे.
सॅच्युरेशन 93 किंवा त्याहून कमी होत आहे, अशक्तपणासारखी परिस्थिती आहे. आपल्या छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, असंही रणदीप गुलेरिया यांनी सांगितलंय.