पुणेकरांनो काहीतरी करा :  देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुण्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-पूर्ण वर्षभर कोरोनाप्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे यावर्षी सुरूवातील काही दिवस दिलासदायक गेले.

हळुहळू राज्यभरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी देखील कमालीची घटली. त्यामुळे प्रशासनानेसुद्धा कोरोना नियम थोड्याफार प्रमाणात शिथील केले. पण हा दिलासा अल्पकाळच ठरला.

त्यानंतर मात्र आता कोरोना गेला असेे समजून कोरोना प्रतिबंधात्मक नियम डावले अन् नागरिक बिनधास्त फिरू लागले आणि त्याचे दुष्परिणाम आता समोर आले आहेत. आजच्या घडीला देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहे

आणि आता तर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अत्यंत वेगाने वाढू लागला आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यातील नव्या कोरोना रुग्णांनी जवळपास ७  हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

मागील २४ तासांत तब्बल ७०९० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३७ जणांचा मृत्यू  झाला आहे. यात सर्वात गंभीर परिस्थिती आहे ती पुणे शहराची. शहरात गेल्या चार दिवसांपासून दररोज साडेतीन हजार रुग्ण सापडत आहेत.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमध्येसुद्धा एक हजाराच्या पुढे रुग्ण आहेत. हे रुग्ण इतक्या प्रचंड वेगाने वाढले आहेत की आता रुग्णालयात बेड देखील उपलब्ध नाहीत. यावरून तेथे काय अवस्था असेल याचा अंदाज आलाच असेल.

पुणे, नागपूर, मुंबई मधील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येने राज्यासह केंद्राचे देखील टेन्शन वाढवले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत ३६,९०२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

तर ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यभरात नाइट कर्फ्यू जाहीर केला आहे. यादरम्यान नागरिकांना रात्रीचा प्रवासावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

दरम्यान पुण्यात लॉकडाऊन होणार की नाही याबाबत दि.२ एप्रिलला बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24