अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-“देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले…हे या गायकवाडला कोण सांगेल. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..
जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर, अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झाला आहे असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्याला आमदार राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर एकीकडे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील संजय गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. “यथा सूडबुद्धी जनाबसेना पक्षप्रमुख तथा टुकार जनाबसैनिक…अरे मंदबुद्धी, ते जंतू नसतात विषाणू असतात, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
भाजपाच्या लोकांचं नीच राजकारण सर्व महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंपा नावाचे ते चंद्रकांत पाटील…आज हा करोना कोणा पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही. करोना फक्त काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला होत नाही.
तर हा करोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला विळखा घालत आहे. आज बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला देण्यासाठी लसी आहेत, पण महाराष्ट्राला नाही. बांगलादेश, पाकिस्तान महाराष्ट्रपेक्षा जास्त महत्वाचे आहेत का? ही राजकारण करण्याची वेळ आहे, असे आमदार संजय गायकवाड म्हणाले होते.