पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांना खास शैलीत प्रत्युत्तर दिले.

संजय गायकवाडांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आरोप करत त्यांची कोरोनाचे जंतू तोंडात कोंबून टाकले असते असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर आमदार नितेश राणे यांनी एक व्टिट करत उत्तर दिले आहे.

“देवेंद्रजींच्या जवळ जाणे तर लांबच राहिले. या गायकवाडला कोण सांगेल.. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल”,

अशा शेलक्या शब्दात नितेश राणे यांनी गायकवाड यांना उत्तर दिले आहे. केंद्रातील भाजपने राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले.

तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांवर केंद्र सरकारने दबाव आणला. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला आमदार संजय गायकवाड यांनी लगावला होता.

माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही त्यांनी भाजपला उद्देशून केले होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24