ताज्या बातम्या

Bike Maintenance For Summers : उन्हाळा येण्यापूर्वीच करा बाईकशी निगडित काम, कोणतीच अडचण येणार नाही

Published by
Ahmednagarlive24 Office

Bike Maintenance For Summers : सध्या उन्हाळी हंगाम येत आहे. त्यामुळे अशा बदलत्या हवामानामुळे तुम्ही तुमची बाईकची विशेष काळजी घ्यावी. कारण उन्हाळ्याच्या दिवसात बाइकला अतिरिक्त मेंटेनन्सची गरज असते. काही पद्धतींनी तुम्ही उन्हाळ्यात तुमची बाईक सांभाळू शकता.

वाढत्या तापमानामुळे चालत्या बाईकचा टायर फुटण्याची शक्यता असते. पण तुम्ही या समस्यांपासून अगदी सहजपणे सुटका मिळवू शकता. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी तुमच्या बाईकची काळजी घ्या, त्याचा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही.

बॅटरी तपासून घ्या

समजा जर तुम्ही उन्हाळ्यात मोकळ्या जागेत बाईक उभी केली केली तर तिच्या अनेक भागांवर परिणाम होतो. यापैकी एक म्हणजे बॅटरी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात बॅटरी तपासली तर तुम्हाला बाईक सुरू करत असताना कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. बाईकच्या बॅटरीमध्ये कोणत्याही प्रकारची गळती झाली असल्यास तर ती दुरुस्त करा किंवा ती बदलून घ्या त्यामुळे प्रवासाच्या मध्यभागी कोणतीही समस्या येणार नाही.

इंजिन तेल तपासा

कोणत्याही वाहनात इंजिन ऑइल खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय उच्च तापमानातही इंजिन सुरक्षित ठेवण्याचे काम इंजिन ऑइल करत असते. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या बाइकसाठी योग्य इंजिन तेल वापरा. सध्या बाजारात बरीच इंजिन ऑइल उपलब्ध असून तुमच्या बाइकसाठी मॅन्युअल पाहून योग्य दर्जाचे इंजिन ऑइल विकत घेऊन ते बाइकमध्ये टाका.

एअर फिल्टर तपासणे

जे नेहमी बाईक व्यवस्थित ठेवतात, त्यांना माहितच असेल की बाईकसाठी स्वच्छ एअर फिल्टर असणे किती महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे, काही जण या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून, केवळ बाइकचे इंजिन ऑइल बदलून एअर फिल्टर साफ करत नाहीत किंवा बदलत नाहीत. याचा खूप मोठा परिणाम बाईकच्या सरासरीवर आणि कामगिरीवरही परिणाम होतो.

स्पार्क प्लग तपासा

तसेच बाईकमध्ये स्पार्क प्लगही दिला आहे. जर ते स्पष्ट नसेल तर बाईक लवकर सुरु होत नाही. त्यामुळे दर दोन ते तीन हजार किलोमीटरनंतर दुचाकीचा स्पार्क प्लग साफ करणे खूप गरजेचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर, मेकॅनिकशी बोलल्यानंतर ते बदलले जाऊ शकते.

हे काम सेवा केंद्रात जाऊनच करा

बहुतांश कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दुचाकीची सर्व्हिसिंग करत असताना ग्राहकांना वेगळ्या जागेवर बसवण्यात येते. परंतु, सर्व्हिस सेंटरमध्ये बाईक सर्व्हिस करून घेतली तर मेकॅनिकला भेटून बाईकबाबत येणाऱ्या अडचणी सांगाव्यात. त्यामुळे तुम्ही त्याच्या मदतीने तुमच्या बाईकमधील त्रुटी वेळेत दूर केल्या जातील.

Ahmednagarlive24 Office