Falling Sleep : गाडी चालवताना झोप येऊ नये म्हणून करा ‘हा’ उपाय, नाहीतर..

Falling Sleep : रात्रीच्या वेळी गाडी चालवत असताना काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण अनेकदा लांबचा प्रवास करत असताना चालकाला थकवा येऊन झोप येते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गाडी चालवताना झोप आली तर खूप अपघात होतात. जर तुम्हालाही झोप आली तर काळजी करू नका. काही उपाय केले तर झटक्यात तुमची झोप पळून जाईल, त्यासाठी ही बातमी काळजीपूर्वक वाचा.

गाडी थांबवा

Advertisement

जर तुम्‍हाला झोप येत असेल तर सर्वप्रथम कार सुरक्षितपणे बाजूला घेऊन काही वेळ कार पार्क करणे चांगले. त्यानंतर गाडीतून उतरून फेरफटका मारा त्यामुळे तुमची झोप पळून जाईल.

गाणे लावा

Advertisement

झोप आली असेल तर कारमध्ये गाणे ऐकले तरीही फायद्याचे आहे. गाणी ऐकण्याबरोबरच ते स्वतःच म्हणा कारण जर तुम्ही असे केले तर झोपही दूर होईल आणि तुमचा प्रवास जास्त मजेशीर होईल.

चहा किंवा कॉफी घ्या

Advertisement

त्याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये गाडी थांबवून चहा किंवा कॉफी पिऊ शकता. कारण चहा किंवा कॉफीमध्ये कॅफिन असते त्यामुळे झोप येत नाही.

जेवण करून गाडी चालवू नका

Advertisement

अनेकांना जेवण केल्यानंतर लवकर झोप येते. त्यामुळे त्यांनी जेवण करून गाडी चालवली तर झोपेमुळे अपघात होऊ शकतो. जर तुम्हाला जास्त वेळ गाडी चालवायची असेल तर पोट भरून खाण्याऐवजी स्नॅक्स वगैरे खाणे फायद्याचे ठरते.

तरीही झोप आल्यास काय करावे

Advertisement

सगळे उपाय करूनही तुम्हाला पुन्हा झोप आली तरी दुसऱ्या व्यक्तीला गाडी चालवायला दिली पाहिजे. नाहीतर तुमच्या जवळच्या रेस्टॉरंटसारख्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी गाडी लावून थोडी झोप घ्यावी.

Advertisement