Indian Railways : रेल्वेला उशीर झाला तर निराश होण्यापेक्षा करा ‘हे’ काम, तुम्हाला मिळेल संपूर्ण परतावा

Indian Railways : देशात दररोज असंख्य लोक रेल्वेने प्रवास करतात. तर तिकिटासाठी आवेदन करणाऱ्यांची संख्या प्रवास करणाऱ्यांपेक्षाही जास्त असते. त्यामुळे अनेकांना कन्फर्म सीट मिळत नाही. त्यासाठी त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.

काहीवेळा रेल्वे खूप उशिरा येते. जर तुमचीही रेल्वे उशिरा आली तर निराश होऊ नका. तुम्हाला तुमच्या तिकिटाचा पूर्ण परतावा माघारी मिळेल. काय आहे रेल्वेचा हा नियम जाणून घेऊयात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय रेल्वेच्या नियमांतर्गत जर एखादी रेल्वे तीन तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीरा आली तर प्रवाशांना रेल्वे तिकीट रद्द करता येते. तसेच त्यांना तिकिटाचा पूर्ण परतावा मिळतो.

या अगोदर ही सुविधा फक्त काउंटर तिकिटांसाठी उपलब्ध होती. परंतु, आता तुम्ही ऑनलाइन तिकिटांवरही सुविधा मिळवू शकता. रेल्वेला उशीर झाला तर तुम्हाला तिकीट रद्द करण्यासाठी आणि रिफंड मिळवण्यासाठी TDR दाखल करावा लागणार आहे.

ही प्रक्रिया खूप सोपी असून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. IRCTC खात्यात तुम्हाला लॉग इन करावे लागेल.

त्यांनतर तुम्हाला My Account मध्ये ट्रान्झॅक्शन हा पर्याय निवडून My File TDR चा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही सहज TDR दाखल करू शकता. त्यानंतर तुम्हाला परतावा मिळेल.