Cancer Risk : सध्या कॅन्सर हा एक सामान्य आजार बनला आहे. खूप जण कॅन्सरने हैराण आहेत. हा आजार जरी सामान्य असला तरी तो खूप गंभीर आजार आहे. याकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर कॅन्सरमुळे एखादा व्यक्ती दगावू शकतो.
धावपळीच्या जगात अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे जेवणाच्या वेळा बदलतात आणि काही जण फास्ट फूड सारखे पदार्थ खातात. परंतु, असे पदार्थ शरीरासाठी खूप हानिकारक आहेत. त्याचा फटका आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळा.
नुकतेच यावर संशोधन करण्यात आले आहे, ज्यात असे आढळून आले आहे की जे लोक बराच वेळ अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खात आहेत, त्यांना कर्करोगाचा धोका जास्त वाढू शकतो. संशोधकांनी अभ्यासात असे सांगितले आहे की अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न केवळ कर्करोगाचा धोका नाही तर ते आरोग्यासाठी सर्वात घातक अन्न आहे.
हे आजार होत असल्याचा दावा
संशोधनात असा दावा केला आहे की अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच्या सेवनामुळे लठ्ठपणा, टाईप 2 मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्याशी निगडित हृदयरोग होऊ शकतो. यात हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्यांचा समावेश असून बचाव करण्यासाठी एखाद्याने शक्य तितक्या लवकर दुसरा आहार घ्यावा.
बऱ्याच जणांवर केला अभ्यास
या अभ्यासात, जवळजवळ 200,000 प्रौढांची माहिती ठेवली होती. जयंत संशोधकांनी 10 वर्षे त्यांच्या आरोग्याचे निरीक्षण केले आणि त्याच वेळी 34 प्रकारच्या कर्करोगाचे निरीक्षण केले असून त्यांनी कर्करोगाने किती लोकांचा मृत्यू होत आहे हे तपासले.
वाढतो कर्करोगाचा धोका
या अभ्यासात असे सांगितले आहे की अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या सेवनामुळे गर्भाशयाचा कर्करोग आणि मेंदूचा कर्करोग होऊ शकतो. गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग ही मृत्यूची सर्वात सामान्य कारणे होती. जे लोक त्यांच्या आहारात अल्ट्रा-प्रक्रिया केलेले अन्न 10 टक्क्यांनी वाढवतात त्यांना कर्करोगाचा धोका सुमारे 2 टक्क्यांनी वाढतो.
कोणते आहेत पदार्थ?