अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- अनेकजण किस करून त्यांचं प्रेम व्यक्त करतात. मग ते हा किस गालावर, मानेवर किंवा हातावर कुठेही करू शकतात. अनेकजण सेक्स अशा दृष्टीने किसकडे बघतात.
ते तसं असेलही. पण किस करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. दररोज एक चुंबन घेतल्यास तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही.
ते तुम्हाला डॉक्टरांपासून लांब ठेवू शकते.” चला तर मग खालील मुद्दयांच्या आधारे किस करण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात…
किस केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते – किस करणे तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकते. उत्कटतेने चुंबन घेतल्याने तुमच्या हृदयाचे ठोके निरोगी पद्धतीने वाढतात. ज्यामुळे तुमचा रक्तदाब कमी होण्यास मदत होते, असं डेमर्जियन म्हणतात.
कॅलरीज घटतात एक रोमँटिक किस केल्याने २ ते ३ कॅलरीज तर भावनिक किस केल्याने ५ पेक्षा जास्त कॅलरीज कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. किस घेताना जेवढा जास्त वेळ लावाल तेवढ्या कॅलरीज बर्न होतील.
हार्मोन्स वाढतात – तुम्हाला ताणतणाव वाटत असल्यास किंवा धावपळ होत असल्यास, थोडेसे चुंबन घेणे किंवा प्रेम करणे हे खरोखरचं अमृत आहे. हे तुम्हाला आराम देईल, पुनर्संचयित करेल आणि पुनरुज्जीवित करेल,
दात चमकदार राहतात किस करताना जी लाळ तयार होते ती दात किडण्यापासून दातांचे संरक्षण करते. दातांवरील अन्नाचे कण आणि काही जंतुंचा नायनाट करण्यास मदत होते. यामुळे दात किडत नाहीत आणि ते लाळेमुळे धुतले गेल्याने चमकदार राहतात.
रोग प्रतिकारशक्ती वाढते किस केल्याने दोघांच्या शरीरात रासायनिक बदल होऊन त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. याने शरीर मजबूत होऊन आजारांपासून लढण्याची क्षमता वाढते.