महागड्या गाड्यांचे शौकीन असलेले अनेक लोक आपण पाहतो. अनेक श्रीमंत लोकांना तर महागड्या कार खरेदी करण्याचा शौक असतो. काहींनी आलिशान कारचा संग्रहही ठेवला आहे. अशा वेळी एक प्रश्न पडतो, की जगातील सर्वात महागडी कार कोणती? ती कुणाकडे आहे? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
सर्वात महागडी कार कोणती?
लक्झरी कारचा विषय येतो त्यावेळी सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे रोल्स रॉयस. रोल्स रॉयस ही एक ब्रिटिश कार उत्पादक कंपनी आहे. त्यांच्या सर्वच गाड्या आलिशान आणि खूप महागड्या असतात. जगातील सर्वात महागडी कार देखील रोल्स रॉयस हिच आहे. आज आपण सर्वात महागड्या माँडेलबद्दल बोलतोय ते, रोल्स रॉयस बोट टेल हे माँडेल आहे. रोल्स रॉयस बोट टेल ही जगातील सर्वात महागडी आणि आलिशान कार आहे.

किती आहे रोल्स रॉयस बोट टेलची किंमत?
रोल्स रॉयस बोट टेलची किंमत सुमारे 28 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २३९ कोटी रुपये आहे. या कारची रचना क्लासिक यॉट म्हणजेच बोटीपासून प्रेरित आहे. अशा परिस्थितीत या कारचे नाव बोट टेल देखील आहे.
कुणाकडे आहे ही महागडी कार?
रोल्स रॉयस कंपनीने त्यांच्या बोट टेल कारचे कंपनीने फक्त तीन युनिट बनवले आहेत. जगातील फक्त तीन लोकांनाच ते विकले आहेत. यामध्ये रॅपर झेड आणि त्यांची पत्नी, पॉप आयकॉन बियॉन्से आणि अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मौरो इकार्डी यांचा समावेश आहे. बोट टेल कारचा तिसरा मालक पर्ल इंडस्ट्रीचा आहे, ज्याचे नाव सार्वजनिक करण्यात आले नाही.