महादेवाच्या पिंडीविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- महादेवाच्या पिंडीविषयी आपण जाणून घेऊ महादेवाच्या पिंडीच्या आकारातच अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही दडलेले आहे.

– घरात, देवघरात पिंड ठेवावी. मूर्ती, फोटो नाही.

– देवघरातील पींडीवर नाग नसावा, नंदीही नसावा.

– पिंड साधी दगडी असली तरी चालते, शक्‍यतो पितळेची असावी.

– देवघरातील पिंड ३ इंचापेक्षा मोठी असू नये.

– महादेवाचा फोटो किंवा मूर्ती फक्त स्मशानात असते.

– देवघरात महादेवाचा फोटो किंवा मूर्ती नसावी. या सात गोष्टी भगवान शंकराला कधीही अर्पण करू नका.

– शंख : शिवपुराणात भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्‍त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.

– हळदीकूंकू : भगवान शंकर आजन्म बैरागी होते. हळदीला सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकराला अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.

– तुळशीपत्र : असुरांचा राजा जालंधर याच्याविषयी असलेल्या कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जालंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.

– नारळपाणी : नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण, भगवान शंकराला अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.

– उकळलेले किंवा पॅकेटमधले दूध भगवान शंकराला अर्पण करू नये. गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधले दूधही उकळलेले असते. त्यामुळे त्याचा वापर करणे टाळावे.

– केवड्याचे फूल : भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णू च्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता.

– कुंकू आणि शेंदूर : कुंकू आणिशेंदुरचा बापरही भगवान शंकराची पूजा करण्यासाठी वर्ज्य केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24