ताज्या बातम्या

तुम्हाला माहितीये Cold Water Therapy म्हणजे काय?; जाणून घ्या सविस्तर

Published by
Sonali Shelar

Cold Water Therapy Benefits : सध्या आपण पाहतो बरेच जण Cold Water Therapy घेत आहेत. तुम्ही हे करताना सेलिब्रिटींना देखील पहिले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का ही Therapy का घेतली जाते? किंवा याचे फायदे काय आहेत? नसेल तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती देणार आहोत.

Cold Water Therapy स्नायूंना आराम देण्यास मदत करते, तसेच याच्यामुळे व्यायामानंतर तुम्हाला ताजेतवाने वाटते, महत्वाचे म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचय सुधारते आणि तुमचा मूड सुधारते. चला तर मग याचे फायदे जाणून घेऊया-

Cold Water Therapyचे फायदे 

अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की Cold Water Therapy मुळे मन शांत होते, ज्यामुळे चिंता आणि नैराश्यासारख्या लक्षणांपासून आराम मिळतो.

शरीर जास्त गरम असताना थंड पाण्यात बुडवून बसल्यास, अतिउष्णतेपासून त्वरित आराम मिळतो. तसेच मनालाही शांती मिळते.

सहसा सेलिब्रिटी किंवा खेळाडू थंड पाण्याने आंघोळ करतात. याचे कारण असे की थंड पाणी रक्तवाहिन्या आकुंचन पावते, ज्यामुळे वेदनादायक भागात रक्त प्रवाह कमी होतो, ज्यामुळे सूज किंवा वेदना कमी होते. यामुळेच दुखापत झाल्यास किंवा स्नायूंना ताण आल्यास बर्फाने फोमेंटेशन करण्याची शिफारस केली जाते.

बर्‍याच संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरात संसर्गाशी लढणारी रसायने बाहेर पडतात, जी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि चयापचय देखील वाढवतात.

थंड पाण्याने आंघोळ केल्याने डोपामाइनचे प्रमाण वाढते, जे ‘फील गुड’ हार्मोन आहे, ज्यामुळे मूड लगेच सुधारतो.

Sonali Shelar