Postmortem Fact : तुम्ही अनेकदा पोस्टमार्टमचे नाव ऐकले असेल. पण हे पोस्टमार्टम का आणि कशासाठी केले जाते? तसेच हे पोस्टमार्टम फक्त दिवसाचं केले जाते रात्री का नाही? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले आहेत का? तर चला जाणून घेऊया यामागील कारण…
पोस्टमार्टम कधी केले जाते हे तर तुम्हाला माहितीच असेल. अपघात,खून, संशयित मृत्यू असे असल्यास पोस्टमार्टम करणे गरजेचे असते. कारण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे खरे कारण समजते.
डॉक्टर आणि फॉरेन्सिक टीम मृतदेहाचे पोस्टमार्टम करतात. पोस्टमार्टम करण्यासाठी पहिल्यांदा जो कोणी मृत व्यक्ती आहे त्याच्या कुटुंबाची परवानगी घेतली जाते. त्यानंतरच डॉक्टर पुढील प्रक्रिया करतात.
अनेकवेळा तुम्ही नातेवाईक किंवा स्वतःच्या घरातील कोणाचा अपघाती किंवा खून होऊन मृत्यू झाला असेल तर रात्री कधीही पोस्टमार्टम करायला घेत नाहीत. आपल्याला सकाळ होण्याची वाट पाहावी लागते.
मात्र तुम्हीही कोड्यात पडला असाल की रात्रीच्या वेळी डॉक्टरांना पोस्टमार्टम करण्यास काय अडचण आहे किंवा रात्री पोस्टमार्टम केल्याने काय होते? मात्र यामागे काही करणे दडलेली आहेत.
कशासाठी केले जाते पोस्टमार्टम?
मृत व्यक्तीचा मृत्यू कशाने मृत्यू कशाने झाला आहे यामागील कारण शोधण्यासाठी डॉक्टर पोस्टमार्टम करत असतात. यामुळे मृत्यू कशामुळे झाला आहे याचे नेमके कारण समजते.
रात्रीच्या वेळी पोस्टमार्टम का केले जात नाही?
मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची वेळ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत असते. या आधी किंवा नंतर पोस्टमॉर्टम केले जात नाही. वास्तविक, असे करण्यामागील कारण म्हणजे रात्रीच्या वेळी ट्यूबलाइट किंवा एलईडीच्या कृत्रिम प्रकाशात दुखापतीचा रंग लाल ऐवजी जांभळा दिसतो आणि न्यायवैद्यक शास्त्रात जांभळ्या रंगाच्या दुखापतीचा उल्लेख नाही.
नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशात दुखापतीचा रंग वेगळा असल्याने शवविच्छेदन अहवालाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. भारतातील न्यायालयांमध्ये वैध असलेल्या जे.सी. मोदी यांच्या ज्युरिस्प्रूडेन्स टॉक्सिकोलॉजी या पुस्तकातही याचा उल्लेख आहे.