UPI : तुम्ही UPI ने पैसे ट्रान्सफर करता का? जाणून घ्या ट्रांजॅक्शन लिमिट

UPI : सगळा देश डिजिटाइजेशनकडे वळला आहे. अनेकजण ऑनलाईन व्यवहार करत आहेत. त्यामुळे सगळी कामे चुटकीसरशी होऊ लागली आहेत. UPI द्वारे कोणालाही आणि कुठेही सहज पैसे पाठवता येतात.

जर तुम्ही UPI ने पैसे ट्रान्सफर करत असाल तर ट्रांजॅक्शन लिमिट किती आहे ते माहिती असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मतानुसार तुम्हाला UPI द्वारे एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर करता येतात. आज अनेकजण Google Pay, Phone Pay, Amazon Pay, Paytm इ अॅप्सवरून UPI ​​द्वारे पैसे ट्रान्सफर करतात.

या प्लॅटफॉर्मवरूनही UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे तुम्ही एका दिवसात निश्चित केलेल्या या मर्यादेपेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर करता येत नाही.

त्याचबरोबर,जर तुम्ही Amazon Pay द्वारे UPI वरून पैसे ट्रान्सफर केले तर तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर करता येत नाही.

Amazon Pay वर नोंदणी केली तर नोंदणीच्या पहिल्या 24 तासांमध्ये तुम्हाला फक्त 5,000 रुपये ट्रान्सफर करता येते. त्यापेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर करता येत नाही.