तुम्ही रेल्वेने प्रवास करतात का? तर हि बातमी तुम्हाला दिलासा देणार…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- रेल्वेत जेवणासंबंधित त्रस्त अससेल्या प्रवाशांची समस्या लक्षात घेत येत्या 14 फेब्रुवारी पासून सर्व ट्रेनमध्ये आयआरसीटीसी कडून भोजनाची सुविधा पुरवली जाणारआहे.

प्रवाशांची आवश्यकता आणि देशभरातील कोरोना लॉकडाउन निर्बंधात शिथीलता आणल्याने पुन्हा एकदा भोजनाची सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आतापर्यंत 80 टक्के गाड्यांमध्ये शिजवलेले अन्न दिले जात होते. आयआरसीटीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शिजलेले जेवण हे नियम आणि अटींनुसार दिले जाणार आहे.

428 ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न आधीच दिले गेले आहे. एकूण संख्येच्या ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न 21 डिसेंबर पर्यंत 30 टक्के दिले गेले होते. 22 जानेवारी पर्यंत 30 टक्के आणि उर्वरित 20 टक्के 14 फेब्रुवारी पर्यंत दिले जाणार आहे.

प्रीमियम ट्रेन (राजधानी, शताब्दी, दुरांतो) मध्ये शिजवलेले अन्न आधीच दिले जात होते. दरम्यान, 23 मार्च 2020 रोजी कोरोनाच्या परिस्थितीमुळे सुरक्षिततेच्या हेतूने खाण्यापिण्याच्या सेवा निलंबित करण्यात आल्या होत्या.

देशात कोविडच्या रुग्णांमध्ये जशी घट होण्यास सुरुवात झाली तशी ट्रेनमध्ये ऑगस्ट महिन्यापासून भोजन देण्यास सुरुवात झाली. कोविड19 च्या प्रोटोकॉलच्या कारणास्तव शिजवलेले अन्न बंद करण्यात आले होते.

त्यामुळे खासगी कंपन्यांच्या माध्यमातून प्रवाशांना भोजन दिले जात होते. यामुळे रेल्वेच्या महसूलाला फटका बसला. मात्र आता पुन्हा एकदा प्रवाशांना रेल्वेत भोजन दिले जाणार आहे.