अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित अहमदनगर यांच्या मार्फत सन 2021-22 मध्ये राबविल्या जाणा-या विविध शासकीय योजनांचे चर्मकार
समाजातील इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षात प्रधान कार्यालयाकडून विशेष घटक योजना 25, बीज भांडवल योजना 23 योजनेचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील झेरॉक्स अर्ज दिनांक 15 जुलै, 2021 पासुन कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत) वसुंधरा अपार्टमेंट, भिस्तबाग, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर या ठिकाणी कर्ज प्रस्ताव स्वत: प्रत्यक्ष अर्जदाराकडूनच स्वीकारले जातील.
असे जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.अहमदनगर यांनी कळविले आहे. महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार इ.) असावा.
अर्जदाराने अथवा अर्जदाराच्या पती/पत्नीने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणा-या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्ण पूर्तता करुन तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावे.
कर्जदाराने प्रस्तावासोबत जातीचा दाखला, चालु वर्षीचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, मतदान/आधारकार्ड व पॅनकार्ड, पासपोर्ट 3 फोटो, कोटेशन (GST क्रमांकसहित),आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल,
वाहनाकरीता लायसन्स/परवाना/बॅच/जामीनदाराचे कागदपत्रे, शपथपत्रे इ., जागेचा पुरावा, भाडेकरारनामा किंवा 7/12 उतारा इत्यादी. (जागा दुस-याची असल्यास संमतीपत्रे व 7/12उतारा), व्यवसायाचा ना हरकत दाखला किंवा शॉपॲक्ट लायसन्स इ. शाळेचा दाखला.
आदी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.