ताज्या बातम्या

Aadhaar Card : आधारकार्डवरील फोटो पाहताच मित्र चिडवतात? काळजी करू नका, ‘या’ सोप्या पद्धतीने बदला आधार कार्डवरील फोटो..

Published by
Ahmednagarlive24 Office

Aadhaar Card : एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा बँकेत नवीन खाते चालू करायचे असेल, त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे फार महत्त्वाचे आहे. कारण आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. याच आधार कार्डवर एक फोटोही असतो.

काहीजणांचा हा फोटो खूप जुना असतो. त्यामुळे काहीजण त्यावरून आपल्याला चिडवतात. जर तुम्हालाही तुमचे मित्र चिडवत असतील तर काळजी करू नका कारण तुम्ही सोप्या पद्धतीने आधार कार्डवरील फोटो बदलू शकता. कसे ते जाणून घ्या.

फॉलो करा या स्टेप्स

स्टेप 1

सर्वात अगोदर तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे.
येथे जाऊन तुम्हाला फोटो चेंज फॉर्म डाउनलोड करावा लागणार आहे. किंवा तुम्ही हे काम mAadhaar अॅपवरून करू शकता

स्टेप 2

त्यानंतर हा फॉर्म भरा
परंतु, जर तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही थेट तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊ शकता.

स्टेप 3

केंद्रावर जाऊन फोटो बदलाचा फॉर्म घेऊन तो व्यवस्थित भरून जमा करा
तसेच इतर कोणतेही दस्तऐवज मागितले तर त्याची छायांकित प्रतही जमा करा

स्टेप 4

तुमचे बायोमेट्रिक बेस सेंटरवरच केले जाईल. तसेच यादरम्यान तुमचा फोटो क्लिक केला जाईल.
यानंतर तुम्हाला एक स्लिप मिळेल. 2 आठवड्यांच्या आत तुमच्या नवीन फोटोसह आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर येईल.

Ahmednagarlive24 Office